Posts

घाव आणि ऐरण

एक लोहारदादा ऐरणीवर हातोड्याचे घाव घालत होते. मी विचारले,"किती वर्षे झाली हातोडी आणि ऐरणीला." लोहारदादा म्हणाले,"हातोड्या अनेक तुटल्या पण ऐरण मात्र तशीच आहे." मी विचारले,"असे का?" तेव्हा त्यांनी सुंदर उत्तर दिले ते म्हणाले, "घाव घालणारे तुटतात. पण घाव सहन करणारे कधीही तुटत नाहीत तर ते कणखरपणे उभे असतात"